30000 रुपयांऐवजी 50 हजार रजिस्ट्रेशन फी? मुंबईत घर खरेदी महागणार; गृहखरेदीदारांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता

मुंबईमध्ये मालमत्ता खरेदी करणं आता पूर्वीपेक्षा जास्त महागात पडू शकते. स्वप्ननगरीत घर, फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदीसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. राज्य सरकार आपल्या तिजोरीतील महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता नोंदणी शुल्क वाढवण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.

मुंबईतील मालमत्ता नोंदणी शुल्क वाढणार?

राज्य सरकार मालमत्ता नोंदणी शुल्क सध्याच्या 30,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यावर विचार करत असून नोंदणी महानिरीक्षक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या जवळपास 10 वर्षांपासून नोंदणी शुल्क जशास तसे राहिले आहेत. पण आता वाढत्या मालमत्ता किमतींना आळा घालण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी ही सुधारणा करण्याची योजना आखली जात आहे.

नोंदणी शुल्क वाढीचा तुमच्यावर काय परिणाम होणार?

घर, जमीन, फ्लॅट, दुकान किंवा इतर कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी व्यवहारावर शुल्क भरणे अनिवार्य आहे, आणि त्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे, शुल्कवाढीला मंजुरी मिळाल्यास खरेदीदारावर 20000 रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *