नाशिकमध्ये संत निवृत्तिनाथ महाराज पालखी मार्गात बदल, द्वारकाऐवजी ट्रॅक्टर हाऊसमार्गे जाणार; शहरातील पालखीमार्ग वाचा सविस्तर

संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा तीन दिवस नाशिक शहरातून पुढे मार्गस्थ होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल केले आहेत. वाहतूक उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. दरवर्षी द्वारकावरून पुढे जाणारी पालखी यंदा ‘ग्रेड सेप्रेटर’च्या कामांमुळे नानावलीतून ट्रॅक्टर हाऊसमार्गे काठेगल्ली सिग्नल या मार्गाने पुढे जाणार आहे. या निमित्ताने तीन दिवस (पालखी मार्गस्त होताना) वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

शहरातील वाहतूक मार्गात बदल

शहरातून पालखी सोहळा आज मंगळवारी (दि. ३०) सुरू होणार असून सातपूर, पंचवटी आणि पळसे गावातील मुक्कामानंतर शुक्रवारी (दि. ३) नाशिक ग्रामीण हद्दीतून पालखी पुढे जाईल. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी शहरात आज, ३० जूनला सकाळी ६.३० ते ३ जुलै सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी काढले आहेत. आदेशातील निर्बंध पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमनदलाची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच ऐनवेळी परिस्थितीप्रमाणे वाहतूक वळविण्यासंदर्भात मार्गात बदल करण्याचे अधिकार राखून ठेवल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

शहरातील पालखीमार्ग

पहिला टप्पा : पिंपळगांव बहुला – समृद्धी टी पॉइंट – पपाया नर्सरी चौक – महिंद्रा सर्कल – सातपूर गाव (मुक्काम)

सरा टप्पा : आयटीआय सिग्नल – एबीबी सिग्नल – पंचायत समिती – जलतरण तलाव – मोडक सिग्नल – सीबीएस – मेहेर सिग्नल – अशोकस्तंभ – रविवार कारंजा – धुमाळ पॉइंट – संत गाडगे महाराज पुतळा – दामोदार टॉकीज – बादशाही कॉर्नर – दूधबाजार चौक – म.फुले मंडई – काजीपुरा चौकी – विठ्ठल मंदिर – आझाद चौक – शिवाजी चौक – शितळादेवी मार्गे गणेशवाडी आयुर्वेद विद्यालय (मुक्काम)

तिसरा टप्पा : नानावली रस्त्यावरुन ट्रॅक्टर हाऊस – घोडेस्वार बाबा दर्गा डावीकडे रवींद्र विद्यालय – बनकर चौक – काठेगल्ली मंदिर सिग्नल – बिटको सिग्नल – मुक्तीधाम मंदिर परत विरुद्ध बाजूने बिटको सिग्नल – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – नाशिकरोडमार्गे सिन्नर फाट्यावरुन पळसे गाव (मुक्काम)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *