‘नार्वेकर कोण लागून गेला?’ भास्कर जाधवांचा बोचरा सवाल, ठाकरे गटात धुसफूस, आता मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, यांच्या मानसिक त्रासाचा फटका शिवसैनिकांना बसतोय…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी फुटीर भूमिका घेतल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पक्षातील दोन बड्या नेत्यांमधील धुसफूसही समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ‘एक्स’ सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून थेट ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविषयीची नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे जाधवांचा व्हिडिओ ट्वीट करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांना टॅग केलं आहे.

मिलिंद नार्वेकर यांचं ट्वीट काय?

Frustration! माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस जी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे! असं नार्वेकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांचा व्हिडिओ

मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. एका वृत्तवाहिनीची महिला पत्रकार भास्कर जाधव यांना प्रश्न विचारत असताना मागून गाडीचे हॉर्न वाजत होते. त्यावेळी जाधव वैतागून त्याकडे पाहतात. तेव्हा पत्रकार तरुणीने ‘मिलिंद नार्वेकर’ आहेत, असं त्यांना सांगितलं. त्यावर ‘नार्वेकर कोण लागून गेला?’ असा प्रश्न विचारला होता. जाधवांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *