केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी (Union Health Ministry) एक मोठा निर्णय घेऊन आरोग्याच्या नावाखाली मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध असणाऱ्या मात्र परिणामांमध्ये शून्य असणाऱ्या काही औषधांवर बंदी घातलेली आहे. यात वेदनाशक, अँटी बायोटिक आणि डायबेटिज आणि त्वचेशी निगडित काही औषधांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने आरोग्याला धोकादायक अशा तब्बल 16 प्रकारच्या ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ म्हणजेच मिश्र औषधांच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि वितरणावर तत्काळ पूर्ण बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्या’च्या कलम 26 ए अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. यात पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलीनसह स्कीन केअरच्या 16 औषधांचा समावेश आहे. ही औषधे आजार बरी करण्यासाठी फारशी प्रभावी तर नाहीतच, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
