सोने दरात 4600 रुपयांची आणि चांदीच्या दरात 12 हजारांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं पडले? व्यावसायिक कारण सांगत म्हणाले…

सोन्याच्या आणि चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.सोन्याच्या दरात 4600 रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर हे 144900 वर आले आहेत.तर चांदीच्या दरात 12 हजार रुपयांची घसरण होऊन ते 237000 वर खाली आल्याचं, पाहायला मिळत आहे.
जळगावातील सुवर्ण व्यावसायिक सुशील बाफना या घसरणी मागील कारणांबाबत माहिती दिली आहे. सोने चांदी दरात घसरण होण्याच्या मागे तीन ते चार प्रमुख कारणे असल्याचं सुवर्ण व्यावसायिक बाफना यांनी सांगितलं.
प्रमुख कारण म्हणजे,अमेरिका इराण मध्ये झालेल्या युद्धाचा परिणाम हा संपूर्ण जगाच्या अर्थ व्यवस्थेवर पडला आहे.अनेक देशांच्या अर्थ व्यवस्था डबघाईला आल्याने,अनेक देशांच्या कडून सातत्याने सुरू असलेली सुवर्ण खरेदी बंद पडली आहे.त्याच बरोबर अमेरिकन फेडरल बँकांचे व्याज दर वाढतील असा अंदाज असताना त्यात कोणताही बदल झालेला नाही.
दुसरीकडे देशात सध्या लगीन सराई नाही,त्यात वर्ष भर सोने खरेदी करून नका,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जनतेकडून मिळालेला प्रतिसाद पहाता,सोन्याच्या मागणीत मोठी घट झाल्याने,मागणी अभावी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं,सुवर्ण व्यावसायिक सांगत आहेत.
दरम्यान, इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून सोन्याचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार 18 जूनला 24 कॅरेट सोन्याचा दर 148093 रुपयांवर होता तो 19 जूनला 144970 रुपयांवर आले. म्हणजेच एका दिवसात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 3123 रुपयांची घसरण झाली. दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचा दर 135653 रुपये तोळ्यावरुन 132793 रुपयांवर आला. म्हणजेच 22 तोळे सोन्याच्या दरात 2860 रुपयांची घसरण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *