आसामच्या जोरहाट इथं वायुदलाचं विमान क्रॅश, जमिनीवर आदळताच दोन तुकडे

आसाममधील जोरहाट इथं असणाऱ्या वायुदलाच्या तळावर उतरताना एक लष्करी विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात पुरवठा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एएन-32 मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला. हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचाव आणि तपास कार्य सुरू असल्याने अधिक तपशील अपेक्षित आहे अशी माहिती भारतीय वायू दलानं दिली.

सदर विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळताच ‘इमरजेंसी रिस्पॉन्स’ पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली. हे विमान लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झालं आणि त्यानं पेट घेतला. ते क्रॅश का झालं याची माहिती अद्याप मिळू शककेली नाही. मात्र अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की विमान जमिनीवर आदळताच त्याचे दोन तुकडे झाले. परिसरात आग उसळली, ज्यामुळं तातडीनं अग्निशामन यंत्रणा तिथं दाखल होत बचावकार्यास सुरुवात केली.

AN-32 हे एक मालवाहू विमान… 

जोरहाट इथं ज्या विमानाचा अपघात झाला, ते एक मालवाहू विमान असून, अशा पद्धतीची एकूम 100 विमानं वायुदलाच्या ताफ्यात आहेत. लष्कराच्या एकंदर गरजांच्या हिशोबानंच ही विमानं तायर करम्यात आली असून, त्यामुळं लष्करी वाहतुकीच उत्तम क्षमतेची विमानं तैनात आहे. उष्ण वातावरणापासून उंचावरील क्षेत्रांपर्यंत ही विमानं लष्करी मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. एका वेळी हे विमान 6 ते 7 टन वजनाचं सामान वाहू शकतं. तर, 40 ते 50 जवानांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची क्षमता या विमानात आहे.

यापूर्वीही घडली होती अशीच दुर्घटना… 

उपलब्ध माहितीनुसार 5 मार्च रोजी आसामच्याच कार्बी आंगलोंग जिल्ह्यामध्ये विमान क्रॅश होण्याची अशी एक घटना घडली होचती. ज्यावेळी सुखोई Su-30MKI हे लढाऊ विमान क्रॅश झालं होतं. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू ओढावला होता. आसामच्या जोरहाट वायुदल तळावरूनच हे विमानसुद्धा दैनंदिन उड्डाणासाठी निघालं होतं. मात्र, सायंकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी अचानक विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि विमानाची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. जोरहाटपासून साधारण 60 किमी अंतरावर असणाऱ्या आंगलोंगमध्ये एका पर्वतरांगेत हे विमान क्रॅश झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *