दाऊद- ISI च्या संपर्कातील भारताचा आणखी एक शत्रू जेरबंद; चार राज्य पालथी घातल्यानंतर हुजैफाला अटक

काही दिवसांपूर्वीच मुंबईसह भारताची राजधानी असणाऱ्या दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला. हल्ल्यासंदर्भाती माहिती आणि संशयितांबाबतचा सुगावा लागताच संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईच्या वांद्रे इथं गरीब नगर या भागामध्ये अवैध बांधकामांवर झालेली कारवाई आणि तत्सम घटनांवर सूड उगवण्यासाठी हे हल्ले केले जाणार होते, ही धक्कादायक बाब तपासातून समोर आली. याशिवाय समोर आली ती अशी काही नावं, जी दाऊदसह पाकिस्तनातील गुप्तचर यंत्रणा आयएसआस आणि दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होती. याच प्रकरणी देशाचा आणखी एक शत्रू पोलिसांच्या हाती लागला असून, त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं पाकिस्तानच्या आयएसआयसह गँगस्टर आणि आय़एसआय एजंट शहजाद भट्टीसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मॉड्युलमधील आणखी एक दहशतवादी हुजैफाला अटक  केली. मुंबईत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून यंत्रणा हुजैफाचा मागोवा घेत होत्या. मुंबई पोलीस पथक आणि मुंबई एटीएसनं त्यासाठी काही ठिकाणी धाडीसुद्धा टाकल्या होत्या.

हुजैफा हा दाऊदचा राईटहँड असल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नव्हे, तर दाऊदचाच विश्वासू हस्तक असणाऱ्या मुन्ना झिंगडाचाही तो जवळच्या व्यक्तींमधला एक प्यादा आहे. मुन्ना कराचीतून मुंबईत काय करावं याच्या सूचना या प्याद्यांना देत होता आणि त्याचनुसार ही कटकारस्थानं इथं आकार घेत हगोचीय मंगळवारी रात्री उशिरा हुजैफाला अटक करण्यात आलं.

आतापर्यंत चार राज्यांमध्ये धाडसत्र… 

दाऊद आणि आयएसआय मॉड्युलच्या 9 दहशतवाद्यांना संरक्षण यंत्रणांनी 4 विविध राज्यांतून अटक केली. साधारण महिनाभरा आधीपासूनच दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि पंजाबमध्ये या दहशतवाद्यांनी कट रचले असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती, ज्यानंतर हे धाडसत्र पार पडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *