मुका बोलू लागला आणि सापडले चोरीचे 7 लॅपटॉप, 35 मोबाईल

मुका बोलू लागला आणि सापडले चोरीचे 7 लॅपटॉप, 35 मोबाईल

मुका-बहिरा असल्याचे भासवून मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरणाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून 7 लॅपटॉप, 35 मोबाईल, 1 डिजिटल कॅमेरा असा एकूण 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आर. रमेश उर्फ एस. कुमार रामचंद्र असे असे अटक करण्यात आलेल्याचे 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो मूळचा आंधप्रदेशमधील चिमूरचा असून सध्या देहूरोडमध्ये राहत होता.

रामचंद्र हा मुका असल्याची बतावणी करून तो घरोघरी मदत मागत फिरत असे. त्या माध्यमातून घराची पाहणी करून तो वेळ मिळाला की ऐवज चोरून नेत असे. पोलिसांनी 15 ऑक्टोबर रोजी संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून तीन मोबाइल सापडले.
त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी अधिक चौकशी केली. त्यानंतर अचानक हा मुका बोलू लागला. त्याच्याकडून पोलिसांनी 7 लॅपटॉप, 35 मोबाईल, 1 कॅनन कॅमेरा असा एकूण 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *