विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत भाजप आणि शिवसेनेतील पेच सुटला नसतानाच, भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते आणि शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा शुक्रवारी (दि. २९) अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार नरेंद्र दराडेंनी प्रचार सुरू केला असतानाच, गितेंनी रिंगणात उडी घेतली असून, भाजपकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीत द्विस्ट निर्माण झाला असून, महायुतीमध्ये या उमेदवारीवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस लोटले तरी, महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत नसल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे. तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यापैकी एक जागा भाजपला हवी आहे. त्यामुळे हा वाद जागेवरून महायुतीचे घोडे अडल असून, हा वाद थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहचला आहे. हा वाद सुटेल असा दावा केला जात असून, नाशिकमध्ये शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. तर सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्तेही रिंगणात आहेत.
