विषारी दारुमुळे दोघांना अंधत्व; मिथेनॉलमिश्रित दारुचे भीषण वास्तव समोर, आतापर्यंत 19 जणांनी गमावला जीव

मिथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारूमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मृत्यूचे थैमान सुरूच असून आता या प्रकरणाचे भीषण वास्तव समोर येऊ लागले आहे. विषारी दारू पिऊन गंभीर झालेल्या रुग्णांपैकी दोघांची दृष्टी गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

विषारी दारू प्राशन केल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या श्रीमंत शिवपुत्र कोळी (वय ५४), प्रकाश उमाजी राठोड (वय ६५) आणि जितू मनोहर शेतादपुरी (वय ३१) यांच्यावर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यापैकी कोळी आणि शेतादपुरी यांचे डायलिसिस करण्यात येत आहे. सुभाष मलप्पा डिगीकर (वय ६६) यांच्यावर मेडिपॉइंट रुग्णालयात, तर चंदन राममली कुमार (वय २६) यांच्यावर औंध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोघांची दृष्टी गेल्याची माहिती समोर आली आहे.

दापोडी-फुगेवाडी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी रात्री गावठी दारूचे सेवन केले होते. सुरुवातीला केवळ डोळ्यांची आग आणि अस्वस्थता जाणवत होती. मात्र, बुधवारी रात्रीपासून अचानक प्रकृती खालावू लागली. तोंडातून फेस येणे, श्वास घेण्यास त्रास, अंधारी येणे आणि छातीत दुखणे अशी गंभीर लक्षणे दिसू लागली. काही रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *