सिंहगड किल्ल्याजवळ बोगदा, खडकवासलावर पूल, पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना वेग; पश्चिम बायपासमुळे फायदा होणार

पुण्यात बाह्य रिंग रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे. रिंग रोडच्या पश्चिमेकडील भागात अनेक भुयारी मार्ग आणि पूल आहेत. या भागावरील काम अधिक कठीण असलं तरी प्रगती दिसून येत आहे. शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक आणि शहराबाहेरील वाहनांची वाहतूक विभागण्यासाठी या सहा पदरी मार्गाची योजना आखली आहे. शहराच्या बाहेरून तयार केलेल्या या वर्तुळाकार मार्गामुळे नागरिकांचा पुण्यातील प्रवास सुखकर होणार आहे.

कसा होणार फायदा?

पुणे रिंग रोडचं काम एकूण 12 पॅकेजेसमध्ये विभागलेलं आहे. यापैकी काही पॅकेजेस पश्चिम तर काही भाग पूर्व भागांत आहे. यापैकी पश्चिमेकडील काम लवकर पूर्ण होणार आहे. संपूर्ण मार्ग 2028पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 173 किमी लांब या मार्गाची योजना सर्वप्रथम 2007मध्ये आखण्यात आली होती. सासवड, नाशिक, अहिल्यानगर, कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तब्बल 1,554.64 हेक्टर जमिनीवर हा मार्ग बनवण्यात येणार आहे. MSRDCकडून या प्रकल्पासं बांधकाम सुरू आहे.

खडकवासला, मुळशी, चाकण, हिंजवडी, सिंहगड, उर्से, सोरतापवाडी आणि वाडेबोल्हाई या गावांमध्ये बांधकाम सुरू आहे. दरम्यान, सांगरूण आणि डावजे गावांमध्ये बोगद्यांचं काम सुरू आहे. या प्रकल्पातील चार मुख्य भागांवर काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.

या सहा पदरी महामार्गासाठी भोर तालुक्यातील रांजे गावात एक 1.5 किमी लांब पूल असेल. या व्हायाडक्टने रिंग रोडला जमिनीवर पोहचवून उन्नत करण्यात येईल. या मार्गावरी सर्वात लांब बोगद्याचं सिंहगड किल्ल्याशेजारी सुरू आहे. हा बोगदा 5.87 किलोमीटर लांब असून रिंग रोडच्या पश्चिम भागातील सर्वात महत्त्वपूर्ण मार्ग आहे. यामुळे खामगाव मावळ आणि कल्याण गावाजवळील 35 किलोमीटर लांब घाट मार्गाला पर्याय उपलब्ध होणार आहे. एक तासाचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत शक्य होणार आहे.
पश्चिम आराखड्यात 8 जुळे बोगदे, सात व्हायाडक्ट, 10 पूल, 26 ओव्हरपास आणि 9 पादचारी अंडरपासचा समावेश आहे. मुंबईहून पश्चिम महाराष्ट्र आणि बंगळुरू प्रवासात वेळ वाचण्याची शक्यता आहे. याशिवाय, खडकवासला धरणावरही एक 500 मीटर लांब पूलाचं काम सुरू आहे. तसेच, कल्याण गावाजवळही काम वेगाने सुरू आहे.

कोणत्या गावांमधून मार्ग?

पूर्व आणि पश्चिम भागांमध्येही पुढे प्रत्येकी दोन टप्प्यात प्रकल्प विभागलेला आहे. फेज 1 आणि 2मध्ये पश्चिम आणि उत्तरेकडील काही गावांमधून मार्ग जाईल. NH50वरी चिंबळीपासून सुरू होऊन पुढे मोई, निघोजे, सांगुर्डे, शेलारवाडी, चांदखेड आणि घोटवडे गावांमार्गे खाली पिरंगुट फाट्यापर्यंत बांधण्यात येईल. दरम्यान, फेज 3 आणि 4मध्ये दक्षिण आणि पूर्वेकडील गावांना पिरंगुटशी भुगाव, चांदणी चौक, आंबेगाव आणि कात्रजमार्गे जोडणार आहे. पुढे पूर्व दिशेकडे मार्गाचा विस्तार होऊन होळकरवाडी आणि वाडकी सारख्या गावांना जोडून पुन्हा वाघोली आणि थेऊरफाट्याकडे वळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *