भारतातील कोणत्या शहरात मिळतं सर्वात स्वस्त पेट्रोल? भाव वाढून सुद्धा ग्राहकांना मोजावे लागतायत फक्त इतके पैसे

पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवार पासून दोघांच्या किंमतीत जवळपास प्रति रुपये 3-3 रुपयांची वाढ झाली असून हे वाढीव दार 15  मे पासून लागू करण्यात आले आहेत. इराण आणि अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यावर सुद्धा देशातील काही शहर अशी आहेत ज्या ठिकाणी तुलनेनं पेट्रोल स्वस्त मिळतं.

कोणत्या शहरात मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल? 

चंदीगडमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल हे चंदीगडमध्ये मिळतं. चंदीगडमध्ये पेट्रोलची किंमत ही 2.97 रुपयांनी वाढली आहे. येथे पेट्रोल 97.27 रुपये प्रति लिटरने मिळतंय. तर इथे डिझेल सुद्धा सर्वात स्वस्त आहे. येथील डिझेलच्या किमतीत 2.80 रुपयांनी वाढ झाली असून त्यामुळे येथे प्रति लिटर डिझेलची किंमत ही 85.25 रुपयांना मिळेल.

कोणत्या शहरात मिळतं सर्वात महाग पेट्रोल? 

देशातील प्रमुख शहरांविषयी बोलायचं झालं तर हैदराबादमध्ये सर्वात महागडं पेट्रोल मिळतं. १५ मे रोजी पेट्रोलचा भाव वाढल्यावर आता हैदराबादमध्ये मिळणाऱ्या पेट्रोलची किंमत ही 110.89 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोलच्या किंमतींमध्ये सर्वात जास्त वाढ सुद्धा हैदराबाद शहरातच झालीये. इथे पेट्रोलची किंमत ही 3.39 रुपयांनी वाढली आहे. तिरुअनंतपुरममध्ये सुद्धा पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तिरुअनंतपुरममध्ये सुद्धा पेट्रोलच्या किंमतीत 3.37 रुपयांची वाढ झाली आहे ज्यामुळे येथील पेट्रोलची किंमत 110.75 रुपये झाली आहे.

कुठे मिळतं सर्वात महागडं डिझेल? 

देशातील सर्वात महागडं डिझेल हे तिरुअनंतपुरममध्ये मिळतं. तेथे डिझेलची किंमत ही जवळपास 99.63 रुपये आहे. तिरुअनंतपुरमनंतर हैदराबादमध्ये सर्वात महागडं डिझेल मिळतं. येथे डिझेलची किंमत 98.96 रुपये इतकी आहे.

भारतातील शहरांमध्ये पेट्रोलची किंमत : 

नवी दिल्ली : पेट्रोल – 97.77 रुपये प्रतिलिटर

                  डिझेल – 90.67 रुपये प्रतिलिटर

मुंबई         : पेट्रोल – 106.64 रुपये प्रतिलिटर

                  डिझेल – 93.14 रुपये प्रतिलिटर

कोलकाता : पेट्रोल – 108.74 रुपये प्रतिलिटर

                  डिझेल – 95.13 रुपये प्रतिलिटर

चेन्नई         : पेट्रोल – 103.9 रुपये प्रतिलिटर

                  डिझेल – 95.47 रुपये प्रतिलिटर

गुरुग्राम       : पेट्रोल – 98.29 रुपये प्रतिलिटर

                   डिझेल – 90.77 रुपये प्रतिलिटर

नोएडा       : पेट्रोल – 98.04 रुपये प्रतिलिटर

                   डिझेल – 91.31 रुपये प्रतिलिटर

बंगळुरू     : पेट्रोल – 106.17 रुपये प्रतिलिटर

                   डिझेल – 94.1 रुपये प्रतिलिटर

भुवनेश्वर     : पेट्रोल – 104.57 रुपये प्रतिलिटर

                   डिझेल – 96.11 रुपये प्रतिलिटर

चंदीगड     : पेट्रोल – 97.27 रुपये प्रतिलिटर

                   डिझेल – 85.25 रुपये प्रतिलिटर

हैदराबाद     : पेट्रोल – 110.89 रुपये प्रतिलिटर

                   डिझेल – 98.96 रुपये प्रतिलिटर

जयपुर          : पेट्रोल – 108.19 रुपये प्रतिलिटर

                   डिझेल – 93.43 रुपये प्रतिलिटर

लखनऊ     : पेट्रोल – 97.58 रुपये प्रतिलिटर

                   डिझेल – 90.87 रुपये प्रतिलिटर

तिरुअनंतपुरम     : पेट्रोल – 110.75 रुपये प्रतिलिटर

                         डिझेल – 99.63 रुपये प्रतिलिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *