परदेशी जायचं बजेट नाही? मग महाराष्ट्रातील मालदीवला कमी पैशात द्या भेट! लोकेशन कोकणात

परदेशात फिरायला जावं असं अगदी सगळ्यांचं वाटतं. पण प्रत्यक्षात सगळ्यांचं हे शक्य नसतं. परदेश ट्रिप म्हंटली ती लाखोंमध्ये खर्च होतो. यासाठी मोठं बजेट लागतं. सोशल मीडियावर सेलिब्रिटनच्या फिडवर दिसणार मालदीव सगळ्यांचं त्याच्याकडे बोलवत असतं. पण तुम्हाला तिकडे जाणं शक्य नसल्यास तुम्ही आपल्या महाराष्ट्रातच असलेल्या मालदीवला जाऊ शकता. ही ट्रिप अगदीच स्वस्तात मस्त अशी होईल. वीकेंडला शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन निवांत वेळ घालवायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्रातील मालदीवला जाऊ शकता. विशेष म्हणजे मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसारख्या शहरांतून येथे पोहोचणं तुलनेने सोपं आहे. त्यामुळे अचानक ट्रिप प्लॅन करणाऱ्यांसाठीही हे ठिकाण परफेक्ट मानलं जातं. महाराष्ट्रातील मालदीव हे कोकणात आहे. चला बघुयात कुठे आहे लोकेशन…

कुठे आहे महाराष्ट्रातील मालदीव?

महाराष्ट्रातच एक असं ठिकाण आहे, जे सौंदर्याच्या बाबतीत मालदीवला टक्कर देतं. कोकणातील तारकर्ली बीच (Tarkarli Beach) हे ठिकाण आज ‘मिनी मालदीव’ म्हणून पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होत आहे. स्वच्छ निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू आणि शांत वातावरण यामुळे येथे आल्यावर क्षणभर आपण महाराष्ट्रात आहोत हेही विसरायला होतं.

कमी बजेटमध्ये मस्त ट्रिप

शांत वेळ घालवण्यासाठी तारकर्ली हा उत्तम पर्याय आहे. परदेशी ट्रिपसारखा मोठा खर्च न करता कमी बजेटमध्येही येथे सुंदर सुट्टी एन्जॉय करता येते. शहरांपासून येथे पोहोचणं जवळ आहे. त्यामुळे अचानक ट्रिप प्लॅन करणाऱ्यांसाठीही हे ठिकाण परफेक्ट मानलं जातं.

तारकर्लीचं असं काय आहे? 

तारकर्लीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वच्छ आणि पारदर्शक समुद्र. किनाऱ्याजवळील पाण्यातील हालचालीही सहज दिसतात. गर्दी कमी असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर शांतपणे बसून निसर्गाचा आनंद घेता येतो. सकाळच्या वेळेला समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा अनुभव तर विशेष असतो. सूर्य उगवताना समुद्रावर पडणारा सोनेरी प्रकाश पाहण्यासाठी अनेक पर्यटक खास येथे येतात.

अ‍ॅडव्हेंचर प्रेमींसाठी स्वर्ग

फक्त निसर्गसौंदर्यच नाही, तर साहसाची आवड असणाऱ्यांसाठीही तारकर्ली खूप खास आहे. येथे स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि बोट राइड्सचा आनंद घेता येतो. समुद्राच्या आत रंगीबेरंगी मासे आणि सागरी जीवसृष्टी जवळून पाहण्याचा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरतो. त्यामुळे अ‍ॅडव्हेंचर प्रेमींसाठी हे ठिकाण मोठं आकर्षण बनलं आहे.

करळी नदीतील हाऊसबोट अनुभव

करळी नदी परिसरातील हाऊसबोटिंग हा देखील पर्यटकांसाठी खास अनुभव असतो. नदी आणि समुद्राचा संगम पाहत बोटीतून फिरताना कोकणाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवता येतं. रात्री हाऊसबोटमध्ये मुक्काम करण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याने अनेक कपल्स आणि कुटुंबीय हा अनुभव आवर्जून घेतात.

कपल्स आणि फॅमिलीसाठी उत्तम ठिकाण

शांत वातावरणामुळे तारकर्ली हे कपल्ससाठी रोमँटिक डेस्टिनेशन मानलं जातं. समुद्रकिनाऱ्यावर फिरणं, सूर्यास्त पाहणं आणि निवांत वेळ घालवणं यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. तसंच लहान मुलांसह कुटुंबासोबत जाणाऱ्यांसाठीही हे ठिकाण सुरक्षित आणि आरामदायी मानलं जातं. मोठी गर्दी नसल्यामुळे निवांत सुट्टीचा अनुभव घेता येतो.

खाण्यासाठी उत्तम पदार्थ 

कोकणात जाऊन मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला नाही तर ट्रिप अपूर्णच म्हणावी लागेल. तारकर्ली परिसरात ताजी मासळी, सोलकढी, कोम्बडी-वडे, भाकरी आणि इतर पारंपरिक मालवणी पदार्थांची चव पर्यटकांना खास आकर्षित करते.

निसर्ग, शांतता, समुद्र आणि स्वादिष्ट जेवण यांचा परफेक्ट संगम अनुभवायचा असेल, तर तारकर्लीला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *