नाशिक पुन्हा हादरलं! शिकवणीमध्ये शिक्षिकेचं धक्कादायक कृत्य; 10 वीतील विद्यार्थींना बेडरुममध्ये पाठवलं अन् तिथे भाच्याने…

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक प्रकरण आणि आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे. अशात नाशिकमधील अजून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये 10 वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीव लैंगिक अत्याचार झाला आहे.  धक्कादायक म्हणजे शिक्षिकेच्या मदतीने तिच्या भाच्याने या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच समोर आलं आहे. ही घटना नाशिकमधील पखालरोड परिसरातील असून पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात नसरापूरमधील साडेतीन वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात आधीच आक्रोश पसरला आहे. अशात नाशिकमधील या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *