1 मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं टिझर नुतकंच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे. ‘नमन तुला’ असं या गाण्याचे बोल आहेत. अमृता फडणवीस यांनी आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर गाण्याच टिझर आऊट केलं आहे.
1 मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं टिझर नुतकंच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे. ‘नमन तुला’ असं या गाण्याचे बोल आहेत. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्राला स्वराज मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना या गाण्यातून आदरांजली वाहिली आहे. या गाण्याचा टिझर आऊट झाला असून 1 मे रोजी गाणं प्रदर्शित होणार आहे.
“जिथे मातीमध्येही शौर्य आहे… तिथेच उभा आहे आमचा राजा नमन तुला!” असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचे शिर्षक आहे की, ‘नमन तुला’. हे गाणे टी-सीरीज यांनी प्रस्तुत केलं असून प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच या गाण्यात चैतन्य कुलकर्णी आणि शक्ती हसिजा यांचाही सहभाग आहे.
‘नमन तुला’ मध्ये नेमकं काय?
‘नमन तुला’ या गाण्याची पहिली झलक पाहायला मिळत आहे. या टिझरमध्ये मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत आहे. गायिका अमृता फडणवीस मराठमोळ्या पेहरावात दिसत आहे. हात जोडून त्यांना छत्रपती शिवरायांना म्हटलं आहे की, ‘नमन तुला’.
अमृता फडणवीस यांची 2026 मधील गाणी
‘शंभू रे’ हे गाणं महाशिवरात्रीनिमित्त 15 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेले महादेवाला समर्पित भजन अमृता फडणवीस यांचे गाणे आले. तसेच ‘किसी की मुस्कुराहटों पे’ जानेवारी 2026 मध्ये प्रदर्शित झालेले एक गाणे आहे. अमृता फडणवीस यांना गाण्याची आवड होती. त्यांनी Axis Bank मधील नोकरी सांभाळत आपली गाण्याची आवड जपली. आता त्यांनी पूर्णपणे गाण्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.
