प्रार्थना अन् अश्रू…4 तास मृत्यूच्या छायेत; लॅण्डिंग फेल झाल्यामुळे विमानात हवेतच घिरट्या घालत होतं,

गेल्या वर्षी एअर इंडिया विमानाचे टेक ऑफ केलं आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं. त्यानंतर विमान प्रवास करताना अनेक प्रवाशी जीव मुठीशी घेऊन प्रवास करतात. अशातच ‘फ्लाय 91’  हे विमान हैदराबादहून कर्नाटकच्या हुबळीकडे टेक ऑफ केलं. पण तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचे लॅडिंग होऊ शकलं नाही. त्यानंतर तब्बल चार तास हे विमान आकाशात घिरट्या घालत होतं. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये तणावाच वातावरण निर्माण झालं. कोणी देवाला साकडं घालत होतं, तर कोणाच्या डोळ्यात पाणी होतं. चार तास प्रवाशांनी मृत्यूचा थरार अनुभवला. या विमानातील या तणावपूर्ण परिस्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यासोबत एका महिलेचा रडताना आणि हात जोडताचा व्हिडीओ अंगावर काटा आणतोय.

नेमकं काय घडलं?

Fly91 एअरलाइन्सचं लँडिंग तांत्रिक कारणामुळे होऊ शकत नाही, हे समजतात विमानात आरडाओरडा सुरु झाला. Fly91 एअरलाइन्स IC3401 विमान दुपारी 3 च्या सुमारास हैदराबाद विमानतळावरून हुबळीसाठी उड्डाण केलं होतं. नियोजित वेळापत्रकानुसार हे विमान हुबळीला दुपारी 4.30 वाजता हुबळीला लॅडिंग करणार होतं.

पण हुबळीला विमान पोहोचता विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लँडिंग होऊ शकलं नाही. त्यानंतर वैमानिकांनी मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या परिसरात विमान आकाशात तब्बल 4 घिरट्या घालत होतं.

विमानात प्रवाशांचा जीव टांगणीला…

विमान हवेत घिरट्या घालत असून लँडिंग होत नाही हे विमानातील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेक प्रवासी भीतीपोटी रडू लागले होते. एकीकडे मृत्यूचं सावट आणि दुसरीकडे तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांनी मृत्यूचा थरार अनुभवला.  विमानातील महिला आणि लहान मुलांच्या घाबरलेल्या आवाजामुळे विमानातील वातावरण अतिशय भीतीदायक झालं होतं.

एक वेळ अशी आली की, तांत्रिक बिघाडामुळे विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि दुसरीकडे इंधनही संपलं होतं. विमानातील भीषण परिस्थितीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल. त्यानंतर वैमानिकांनी मोठ्या शर्थीने विमान बंगळुरूमधील केम्पोगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याचा निर्णय झाला. अखेर संध्याकाळी 7.30 बंगळुरू विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आलं.  या लँडिंगनंतर विमानातील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *