जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, भयानक त्सुनामीचा इशारा, समुद्रात उंच लाटा उसळणार

जपान भूकंपाने हादरला आहे. जपानमध्ये शक्तिशाली भूकंप आला आहे. यानंतर भयानक त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन अलर्टमोडवर असून सर्व बचाव पथके आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

जपानच्या  ईशान्य किनारपट्टीवर भूकंपाचे हादरे जावले. या भूकंपाची तीव्रता 7.3 रिश्टल स्केल इतकी आहे. या शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुढील काही तासात आओमोरी, मियागी आणि फुकुशिमा येथेही त्सुनामी येण्याची शक्यता आहे, मात्र या लाटांची उंची केवळ तीन फूट असण्याची अपेक्षा आहे.
प्रशासनाने किनारपट्टीच्या भागात, विशेषतः इवाते प्रांत आणि होक्काइडोमध्ये राहणाऱ्या लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या आहेत.  समुद्रात 3 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात, ज्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर नुकसान करू शकतात.

गेल्या महिन्यात जपानचे सर्वात मोठे बेट असलेल्या होंशूच्या पूर्व किनाऱ्याजवळ 6.2 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला होता अशी माहिती जर्मन भूविज्ञान संशोधन केंद्राने दिली. हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला होता. यापूर्वी, बुधवारी रात्री 8:31 वाजता एक भूकंप झाला होता.   4.2 तीव्रतेचा हा भूकंप होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू आग्नेय ह्योगो प्रांताच्या 20 किलोमीटर खोलीखाली होता.

जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. पॅसिफिक रिंग ऑफ फायर प्रदेशात वसलेला आहे. जिथे चार प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्स एकत्र येतात. येथे दरवर्षी सुमारे 1500 भूकंप होतात, जे जगातील एकूण भूकंपांच्या सुमारे 18 टक्के आहे. येथे सत्त भूकंपाचे सौम्य धक्के बसत असतात. तर अनेक मोठे विनाशकारी भूकंप देखील आले आहेत. 2011 मध्ये विध्वंसक  भूकंप आला होता. यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे जपानमध्ये मोठे नुकसान झाले होते. 2011 चा तोहोकू भूकंप आणि त्सुनामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुर्घटनेत अंदाजे 18,500 लोक मृत्युमुखी पडले होते.  फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पालाचे देखील मोठे नुकसान झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *