सोशल मडियाचं कोणतंही माध्यम सुरू केल्यानंतर क्षणोक्षणी अपडेट होणाऱ्या या विश्वातून बहुविध क्षेत्रांसंदर्भातली माहिती अगदी एकाच ठिकाणी मिळून जाते. अशा सोशल मीडियावर एक- दोन दिवसांपासून काही दृश्य सातत्यानं Insta Reels किंवा Shorts च्या माध्यमातून समोर येत आहेत. ही दृश्य आहेत एका आई आणि मुलीची, ज्यांना देवदर्शनाला गेलं असता तिथं आपला हरवलेला भाऊ, मुलगा दिसतो आणि त्याची अवस्था पाहून त्या दोघीसुद्धा बेचैन होतात, बिथरतात. भावना दाटून येतात. व्हिडीओचं कॅप्शन आणि त्यासोबत असणारी माहिती पाहता वैष्णो देवी धाम इथं ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय? हा प्रश्नसुद्धा अनेकजण उपस्थित करत आहेत.
अतिशय भावनिक गाणी लावत सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांनासुद्धा भावूक करताना दिसत आहे. ज्याच्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी या घटनेबाबत अनेक कुतूहलपूर्ण प्रश्न आणि प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत.
