प्रेमासाठी महिला इंदोरहून पुण्यात आली, हॉटेलमध्ये राहिली, मात्र नंतर वेगळाच अनुभव; तरुणावर गुन्हा दाखल

नोकरीचे आश्वासन दिले मात्र, नंतर दिला लग्नाला नकार…

आरोपीने सदर महिलेला नोकरीचे आश्वासन दिले आणि पीडित महिला इंदोरचा जॉब सोडून पुण्यात आली. पुण्यात आल्यानंतर चव्हाण याने तिला स्वतःच्या हॉटेलमध्ये कामाला लावले. त्याच हॉटेलमध्ये तिची राहण्याची सोय केली. चार ते पाच महिने पीडित महिला त्याठिकाणी राहिली. त्यावेळी अनेकदा तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर मानसिक दबाव टाकला आणि तिचा गैरफायदा घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

हॉटेलमध्ये काम करत असताना पगाराच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाले. तरीही आरोपी वेळोवेळी “लग्न करू” असे सांगत तिला आश्वासने देत राहिला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने अचानक लग्नास नकार दिला आणि महिलेपासून दूर राहू लागला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. मानसिक धक्का बसलेल्या महिलेने अखेर हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून लवकरच आरोपीला अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइट्सवरील फसवणुकीचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा समोर आले आहे. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देताना सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *