मुंबईतील ‘म्युझिकल रोड’वर फुल स्टॉप! आठवड्यातील 3 दिवस बंद राहणार मार्ग; 6 कोटींच्या प्रयोगाला स्थानिकांचा विरोध

मुंबई सागरी किनारा मार्गावर वाहनचालकांना ‘म्युझिकल रोड’चा अनुभव देण्यासाठी संगीतपट्ट्यांची रचना करून ‘जय हो’ची सुरावट ऐकवण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला होता. मात्र रात्रंदिवस सुरू असलेल्या या आवाजामुळे त्रासलेल्या स्थानिकांच्या तक्रारींनंतर, रस्त्याचा हा भाग आठवड्यातील तीन दिवस काही वेळासाठी बंद ठेवण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत ही सुरावट वाजणार नाही.

कुठे आहे ‘म्युझिकल रोड’?

मरिन ड्राइव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावर वाहनचालकांना ‘म्युझिकल रोड’चा अनुभव मिळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारीला या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. या मार्गावर नरिमन पॉइंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तरमार्गिकेवर हा प्रयोग साकारला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर, दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. यावरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास ‘जय हो’ या गीताची धून वाहनात बसलेल्यांना ऐकू येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *