पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड!

पाकिस्तानने वारंवार ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानात नसल्याचा दावा केला होता. मात्र, ओसामा बिन लादेन पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये असल्याची माहिती मला, अध्यक्ष जरदारी आणि तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अशफाक कयानी यांना होती, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे माजी संरक्षण मंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

२०११ मध्ये अमेरिकेच्या सैन्याने पाकिस्तानात अबोटाबादमध्ये हल्ला करुन लादेनला ठार केले होते. त्यावेळी लादेन पाकिस्तानात होता हे आम्हाला माहीतच नव्हते, असा कांगावा पाकिस्तानने केला होता.

मात्र आता ओसामा पाकिस्तानात असल्याची माहिती पाकिस्तान सरकारला त्यावेळी होती, असा खुलासा करत मुख्तार यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघडकीस आणला आहे.

चौधरी अहमद मुख्तार हे २००८ ते २०१२ दरम्यान तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या सरकारमधील पाकिस्तानचे संरक्षणमंत्री होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *