दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; BMW कारचा चुराडा, प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात BMW कारचा चुराडा झाला आहे,  राजस्थानमधील प्रसिद्ध उद्योजक वल्लभ माहेश्वरी यांचा या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वल्लभ माहेश्वरी हे या BMW कारमधून प्रवास करत होते. कारचा कंट्रोल गेल्याने हा अपाघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमका कुठे झाला अपघात?

अलवरच्या रैनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. महेश्वरी जयपूरहून गिरिराज जी मथुरा येथे त्यांच्या कारने प्रवास करत असल्याचे वृत्त आहे. वल्लभ माहेश्वरी जयपूरहून दिल्लीला जात असताना हा अपघात झाल्याचे समजते. या दरम्यान त्यांची बीएमडब्ल्यू कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेदरम्यान, कार अनियंत्रित झाली, दुभाजकाला धडकली आणि मध्यभागात घुसली, त्यानंतर ती कल्व्हर्टच्या भिंतीशी आदळली आणि उलटली झाली.

BMW कारचा चेंदामेंदा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर चेंज 136.8 जवळ दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. वेगाने येणारी कार प्रथम बॅरिकेड्स तोडून दुभाजक ओलांडली आणि नंतर कल्व्हर्टच्या भिंतीवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढचा भाग, विशेषतः इंजिनजवळ बोनेटचा भाग  पूर्णपणे चिरडला गेला. यात माहेश्वरी यांचा मृत्यू झाला आहे. तर, चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात वल्लभ माहेश्वरी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आणि पोलिसांनी त्यांना ताबडतोब कारमधून बाहेर काढले. यांना तात्काळ पिनान आदर्श सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) नेले. तेथील डॉक्टरांनी दोघांवरही प्राथमिक उपचार केले, परंतु माहेश्वरीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अलवर येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर त्यांना अलवर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले , जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या चालकावर अजूनही उपचार सुरू आहेत. या दुःखद घटनेमुळे व्यापारी जगात शोककळा पसरली आहे. देश आणि राज्यातील अनेक उद्योजकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

एक्सप्रेस वेवर अपघातांची मालिका सुरुच

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातील सर्वात आधुनिक आणि हायस्पीड महामार्गांपैकी एक आहे. तथापि, या हायस्पीडमुळे अपघातांचा धोका देखील निर्माण होतो. अलिकडच्या काळात या एक्सप्रेस वेवर अनेक मोठे अपघात झाले आहेत. रस्त्याच्या लांब सरळ पट्ट्यांमुळे अनेकदा वाहनचालकांना झोप येऊ शकते, जे अपघातांचे एक मोठे कारण असू शकते, असे तज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *