नाशिकमध्ये दहावीच्या मुलांचे 5वी ते 7वीच्या मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य; गुंगीचे औषध देऊन दारु पाजून केला अत्याचार

दहावीच्या विद्यार्थ्यांनी  5वी ते 7वीच्या विद्यार्थांना गुंगीचे औषध देऊन दारु पाजली. यानंतर या मुलांनी  5वी ते 7वीच्या मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केले.  नाशिकमधील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिकच्या इगतपुरीजवळ (Igatpuri Crime News) समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह आहे. या वसतीगृहात  अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक संतपाले.

पीडित मुलांनी आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा (Crime News) दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिस ठाणे गाठले.  इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात हा संतापजनक प्रकार घडल्याने  परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

विद्यार्थ्यांसोबत असा प्रकार घडल्याने पालक संतापले. पालकांसह विद्यार्थ्यां गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिस ठाण्यात गेले. इगतपुरी पोलिसांकडून मात्र फिर्याद घेण्यास टाळाटाळ सुरू असल्याचं समोर आलं आहे.  दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचे विद्यार्थांनी सांगितले. विद्यार्थ्यांसह पालकांनी पोलिसांना याबाबत तक्रार दाखल करण्याची मागणी केली. मात्र. पोलिसांनी तक्रार करुन घेण्यास टाळाटाळ केली आहे. पालकांनी वसतिगृह  व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असा आरोप पालकांनी केला.  हा  प्रकार अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांसह वसतिगृह व्यवस्थापनावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी पालकांनी केली आहे. अशातच, गुन्हा दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याने  पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *