पुण्यात द्राक्षाच्या नव्या वाणाला दिले दिवंगत अजित पवार यांचे नाव!

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेलीत जैविक निविष्ठा प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले असून याच वेळी द्राक्ष शेतीत निवड पद्धतीने नवा वाण निर्माण करण्यात आला आहे. अजित सीडलेस असं या नव्या वाणाचं नामकरण करण्यात आले आहे. निवड पद्धतीनं निर्माण करण्यात आलेल्या या नव्या द्राक्षाच्या वाणाला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देऊन अजितदादांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

अजित सीडलेस द्राक्षाचे नामकरण, आखाती देशातही मागणी 

यावेळी बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉक्टर कौशिक बॅनर्जी, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉक्टर राजीव मराठे, सिडकोचे सह संचालक दिलीप ढोले, श्रीराज भरणे आणि महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र वाघमोडे यांची उपस्थिती होती. हा वाण रोगास कमी बळी पडतो, निर्यातक्षम द्राक्षे निर्माण होतात, तिन्ही हंगामात हा वाण चांगले उत्पादन देतो.पाच वर्षे या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या वाणाचे घड 300 ग्रॅम पेक्षा अधिक येतात, आखाती देशात याला मागणी देखील आहे.

बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानावर अजित पवार यांचा पुतळा 

पुणे हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिव्हाळ्याचे शहर होते. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघाताने सर्वांच्याच मनावर दुःखाचा डोंगर कोसळा होता. अजूनही बारामतीतील नागरिक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अजित पवार यांच्या निधनानंतर  त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावर पुतळा आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील शेतकरी कुटुंबाने विकसित केले लाल रंगाचे द्राक्ष

दरम्यान, गेल्यावर्षी पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाने लाल रंगाचे द्राक्ष तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. अनेक वर्षांपासून हे कुटुंब याबाबत संशोधन करत होते. हिरव्या रंगाच्या द्राक्षापासून लाल रंगाचे द्राक्ष तायर करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग होता. पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाच्या द्राक्षाच्या माणिक चमन व्हरायटीला सरिता या काळ्या रंगाच्या वाणाचे नैसर्गिक परागीभनव झाले. त्यानंतर कुटुंबीयांना बागेत लाल रंगाचे काही घड आढळून आले. ज्यांवर चाचण्या करण्यात आल्या. त्यातूनच लाल रंगाचे वाण विकसित केले. या वाणाचे नामकरण त्यांनी 55 (SMS 55 Grape Variety) असे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *