नाशिकमध्ये देवाच्या दारातच भक्ताला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्ताला बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांकडून भक्ताला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. मोबाईल कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला असून यानंतर संतापाची लाट आहे.
रविवारी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुन्हा एकदा भाविकाला सुरक्षारक्षकांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकाला सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाली. सुरक्षारक्षकांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण करत भाविकाला मंदिराबाहेर काढलं.
मंदिरातील सुरक्षारक्षक भाविकावर तुटून पटले आहेत. त्याला कानाखाली, लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. मारहाण इतकी बेदम आहे की, त्याचे कपडेही फाटल्याचं दिसत आहे. यादरम्यान इतर भाविक आश्चर्याने पाहत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
