‘पैसे दिले नाही, तर जिवंत सोडणार नाही’; पुण्यात एकट्यात गाठलं, मारहाणीत 24 वर्षीय तरुणाला संपवलं

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात पैशांच्या जुन्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची मोठी घटना समोर आली आहे. मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे अकराच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हाशिम सईद राईन असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

मृत तरुण हा रात्री जेवण करून आपल्या घरी परतत असताना काही संशयितांनी त्याला अडवलं. जुन्या आर्थिक व्यवहारावरून दोन्ही बाजूंमध्ये आधी शाब्दिक वाद सुरू झाला. काही क्षणांतच हा वाद हाणामारीत परिवर्तित झाला. याच दरम्यान एका आरोपीने धारदार चाकू काढून तरुणाच्या डोक्यावर आणि छातीवर वार केल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *