महापौरांच्या मनगटावर 1 कोटीचं घड्याळ?; फोटो सोशल मीडियावर Viral झाल्यावर चर्चांना उधाण

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या मनगटावरील घड्याळामुळे त्यांच्या एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घड्याळ तब्बल एक कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घड्याळा रोलेक्स कंपनीची आहे. या घड्याळाचं नाव यलो गोल्ड रोलेक्स डेटोना लाइट डायल आहे. तर भारतीय बाजारपेठेमध्ये या घड्याळाची किमत एक कोटींची घरात आहे. महापौर रितू तावडे यांच्या मनगटावर असलेली घड्याळासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहोत.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मनगटावर असलेल्या घड्याळाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मोदींच्या मनगटावरील घड्याळ्याची किमत ही 50 हजार रुपये सांगण्यात आली होती. त्यावेळी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींदेखील ट्रोल झाले होते. फकिराकडे एवढं महाग घड्याळ कसं असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थितीत केला होता.

आता मुंबईच्या महापौर पदी निवडून आलेल्या भाजपचा घाटकोपरच्या नगरसेविका रितू तावडे यांच्यावर सोशल मीडियावर टीका होतेय. दरम्यान रितू तावडे यांनी सोशल मीडियावरील आरोप फेटाळले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या घड्याळाची माहिती ही खोटी आणि दिशाभूल करणारी आहे, असं महापौर रितू तावडे यांनी सांगितलं आहे.

एवढंच नाही तर महापौर रितू तावडे या घड्याळज्यामुळे संपत्तीचीही चर्चा होतेय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भरलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबद्दल सांगितलं होतं. त्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ही 5 कोटी 26 लाख 76 हजार 417 एवढी नोंदवण्यात आली आहे. त्यासोबत त्यांच्याकडे तीन वाहने देखील आहे. टोयोटा फॉर्च्युनर ज्याची किंमत 64 लाख 50 हजारांच्या घरात आहे. त्यांच्याकडे दुसरी गाडी ही ह्युंदायी आय 20 स्पोर्टस् असून तिची किमत 6 लाख 43 हजार 136 असून होंडा ॲक्टीवा जी 90 हजार 150 रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *