फ्लिपकार्टची १० तासांत १० लाख उत्पादनांची विक्री

ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ऑनलाईन विक्रेता वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’ या कंपनीचा ‘बिग बिलियन डेज’ सेल सुरू असून फ्लिपकार्टने पहिल्या १० तासात १० लाख उत्पादने विक्रीचा विक्रम केला आहे. फ्लिपकार्टने ट्विटरद्वारे ही माहिती दिली असून, ग्राहकांचे आभारही मानले आहेत.

प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने यावर्षी ७० उत्पादकांची विविध प्रकारची ३० लाख उत्पादने विक्रीला ठेवली आहेत. पहिल्या १० तासात १० लाख ६० हजार ग्राहकांनी संकेतस्थळावर भेट दिली. यामधील १० लाख ग्राहकांनी २५ उत्पादने खरेदी केली. बंगळुरु, दिल्ली आणि चेन्नई यात आघाडीवर असून लुधियाना, लखनऊ आणि भोपाळमधूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या सेलमध्ये फॅशन आणि त्यासंबंधित उत्पादनांना सर्वाधिक मागणी आहे. पुरुषांसाठीचे पोशाख, फुटवेअर, शूजला सर्वाधिक पसंती मिळत आहे, असे कंपनीकडून ट्विट करण्यात आले आहे.

पुरूष आणि महिलांसाठीच्या फुटवेअरवर २५ ते ५५ टक्के सवलत दिली जात आहे. फ्लिपकार्टचा ‘बि‍ग बि‍लि‍यन डेज‘ १३ ऑक्टोबरपासून १७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्ट प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्तूंवर विशेष सवलती आणि सूट देणार आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फक्त ‘ऍप’च्या माध्यमातूनच या सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. पाच दिवसांच्या या बिग बिलियन सेलसाठी फ्लिपकार्ट आणि मित्रा यांनी भागीदारी केली आहे.

कंपनीत ३३ हजार कर्मचारी कार्यरत असून कंपनीकडे ५० लाख ग्राहकांनी अधिकृत नोंदणी केला आहे. हे कर्मचारी दिवसभरात १० लाख ग्राहकांना प्रतिसाद देत असून महिनाभरात आठ लाख पार्सल पोहचवत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *