डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली मधील नामांकित बड्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने आत्महत्याचा प्रयत्न केला. 10 बिअर पिऊन आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन या डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केला. या डॉक्टरचे नर्स सोबत प्रेमसंबध होते.
डोंबिवली पूर्वे येथील एका नामांकित डॉ चे हॉस्पिटल मधल्या नर्स सोबत प्रेम संबंध होते मात्र लग्नाचा तगादा लावल्याने अखेर डॉक्टरने 10 बिअर पिऊन आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरची पत्नी देखील डॉक्टर आहे. हॉस्पिटल मधील एका नर्ससोबतच प्रेमसंबंध असल्याने डॉक्टर दुसऱ्या घरात राहता. त्याच घरात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली धक्कादायक घटना
डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक नामांकित हॉस्पिटल आहे. डॉक्टरची पत्नी देखील डॉक्टर आहे. दोघे मिळून हॉस्पिटल चालवितात. डॉक्टर हॉस्पिटल न आल्याने डॉक्टरांना वारंवार फोन करण्यात आले. परंतू डॉक्टरने फोन उचलला नाही. हॉस्पिटल मधील कर्मचारी डॉक्टरच्या घरी गेले. कसे बसे दार उघडले गेले. डॉक्टर बेशुद्ध होऊन खाली पडले होते. त्यांना तात्काळ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या डॉक्टरचे हॉस्पीटलमधील एका नर्ससोबत प्रेमसंबंध आहे. प्रेमसंबंध असल्याने डॉक्टरचे पत्नीसोबत वारंवार वाद होत होते. डॉक्टरने या वादातून डोंबिवली पूर्वेत हायफाय सोसायटीत घर घेऊन राहण्यास सुरुवात केली. यावेळी नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी तगादा लावला. डॉक्टरने सांगितले की, माझे लग्न झाले आहे. तुझ्याशी लग्न कसे काय करु. त्यावर नर्सने डॉक्टरसोबत या कारणावरुन बोलणे बंद केले. डॉक्टर या कारणावरुन व्यथित झाले. त्यामुळे डॉक्टरने 10 बिअर पिऊन आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस तपास करीत आहे.
