अजय देवगणच्या सभेत गोंधळ; पोलिसांचा लाठीमार

अजय देवगणच्या सभेत गोंधळ; पोलिसांचा लाठीमार

बिहारमधील निवडणूक प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत पोलिसांनी लाठीमार केल्याने गोंधळ उडाला. या गोंधळात अजय देवगण सभास्थळी न येताच माघारी परतला.

बिहारशरीफ येथे श्रम कल्याण केंद्राच्या मैदानावर भाजपा उमदेवार डॉ. सुनील यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा आयोजित केली होती. बॉलीवूड अभिनेता अजय देवगण या प्रचार सभेसाठी येणार होता.

येथे अजय देवगणला पाहण्यासाठी गर्दी उसळली. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे सभास्थळी गोंधळ निर्माण झाला.

संतप्त कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड करून गोंधळ घातला. दरम्यान, सभास्थळी गोंधळ झाल्याचे समजताच अजय देवगण याने सभास्थळी न येता परत जाण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *