अमरावतीच्या वरुडमधून एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात एसटी बस आणि ऑटोमध्ये जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या माहिती आहे. वरुड तालुक्यातील राजुरा- वरुड रोडवर रेल्वे क्रॉसिंग समोर ऑटो आणि इलेक्ट्रिक बसचा हा भीषण अपघात झालाय. या अपघातात ऑटो मधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी तिघांना नागपूर या ठिकाणी रेफर करण्यात आले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशन हद्दीत वरुड-राजुरा बाजार रोडवर एसटी बस आणि प्रवासी ऑटोचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोमधील एका शाळकरी विद्यार्थ्यांनीसह 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलवले आहे. एसटी बस वरुडवरून वर्धाकडे जात होती. दरम्यान, मागून एसटी बसने प्रवासी आटोला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच चेंदामेंदा होऊन त्यांचा मृत्यू झालाय. मृत्यूदेहाचे हात पाय आणि शरीराचे वेगवेगळे भाग झाले होते. तर या आटोचे दोन तुकडे झाले आहेत. एसटी बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहे तर एसटी आणि एसटी चालक यांना वरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तर घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे, या घटनेनंतर वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मृत्यु झालेल्यांची नावे
1) माही प्रविण मांगुळकर (१३ वडेगाव)
2) कैलास घनश्याम नागदेवे (४२ वाडेगाव)
3) हरीभाउ दौलत शिंदे (८३ वघाळ)
4) चिंतामन सदाशिवराव नागदेवे (६० वाडेगाव)
