पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा आश्वासन दिलं होतं.दहा महिने झाले तरी नोकरी न मिळत नसल्याने जगदाळे कुटुंबीयांना सरकारी कामाचा फटका बसला आहे. आम्ही या दुःखातून सावरलो नाही तरीही आमच्यावरही वेळ आल्याची भावना आसावरी जगदाळे यांनी व्यक्त केलीय. सरकारने पहलगाम हल्ला विसरून आमच्याकडे दुर्लक्ष करू नये अशी प्रतिक्रिया आसावरी जगदाळे यांनी दिली आहे.आसावरी जगदाळे यांना महिना अखेरपर्यंत नोकरी नाही दिली तर उपोषण करण्याचा इशारा संतोष जगदाळे यांच्या पत्नीने दिला आहे.