राज्यात थंडी गायब, आता पडणार कडक ऊन; येत्या दोन दिवसांत मुंबई, पुण्यातील तापमानाचा पारा चढणार

मुंबईतील थंडीने आता बॅकसीट घेतली असून, शहरात तापमानाचा पारा चढत आहे. तसच, पुणे जिल्ह्यातही हळूहळू उन्हाळ्याचं आगमन होण्याची चिन्हं दिसत आहेत. या संपूर्ण आठवड्यात, दोन्ही शहरातील हवामान मुख्यतः कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असून, वातावरणात उकाडा वाढणार आहे.

मुंबई शहरातील हवामान

आज दिवसभर मुंबईतील किमान तापमान 18 अंश सेल्सियस असेल तर कमाल तापमान 33 अंश सेल्सियस असेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभर तापमान स्थिर राहून 11 ते 12 फेब्रुवारी दरम्यान वाढण्याची शक्यता आहे. सकाळी थोडा गारवा जाणवेल पण दुपारपर्यंत कडक ऊन पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या वेळेत घरातून बाहेर पडणे टाळावे व उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री, टोपी यासारख्या वस्तूंचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *