एचआरएसपी नंबर प्लेट लावण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख होती. नंबर प्लेट लावण्यासाठी ज्या वाहनधारकांनी नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी स्लॉट बुक केले होते, अशा वाहनधारकांना जानेवारी महिन्यात नवीन नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्याशिवाय १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. यामुळे आगामी १८ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.
काय आहे नियोजन?
केंद्र शासनाने एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे आदेश जारी केले. जानेवारी महिन्यात बहुतेक वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना नंबर प्लेट लावून घेतली आहे. काही वाहनधारकांना फेब्रुवारी महिन्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे. यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत नवीन नंबर प्लेट बसविण्याची संधी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यानंतर १८ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते.
