महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेटीला गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे आधी सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थाली पोहोचले. त्यानंतर शरद पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या दिशेला भेटीसाठी निघाल्याची माहिती समोर आली. शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांचा त्यांची भेट घेत आहेत. सहयोग सोसायटी येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
बारामतीत सहयोग सोसायटीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान आहे. अजित पवार यांच्या निधन नंतर पवार कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी राज्यासह देशाभरातील अनेक जण सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी येत आहेत. रोहित पवार यांच्यासह त्यांचे आई-वडील हे देखील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. संपूर्ण पवार कुटुंबिय इथे आले असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी आले आहेत.
