सुखी संसाराची स्वप्नं विरली, अजितदादांची फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीच्या पतीच्या अश्रूंचा बांध फुटला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिचाही दुर्घटनेत मृत्यू झाला. २९ वर्षीय पिंकी माळी मुंबईची रहिवासी होती. अवघ्या अडीच वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता.

पिंकीचे वडील शिवकुमार माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडिलांशी शेवटचे बोलणे झाले, तेव्हा तिने सांगितले होते की ती अजित दादांसोबत बारामतीला जात आहे आणि त्यानंतर नांदेडला जाईल. हॉटेलला शिफ्ट झाल्यावर ती वडिलांना कॉल करणार होती

पिंकीचा फोन आला नाही म्हणून तिचे वडील अस्वस्थ झाले. शिवसेना नेते समाधान सरवणकर यांनी शिवकुमार यांना लेकीच्या विमान अपघाताची माहिती दिली. त्यांनी टीव्ही चालू केला, तेव्हा दिसणारं दृश्य त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं.

.. तेव्हा घरच्यांना बातमी समजली

“ती आज सकाळी लवकर निघाली होती. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी टीव्हीवर दिसल्यावर मला धक्का बसला. जेव्हा माझ्या मुलीचं नाव ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकलं, तेव्हा आम्हाला समजले की आम्ही तिला गमावलं आहे” असं तिचे बाबा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *