सासू सरपंच, सासरा शिक्षक, 50 तोळं सोनं ते 25 लाखांची कार अन्…; इंजिनियर दीप्तीच्या आईची धक्कादायक माहिती; हुंडाबळीनं पुणे हादरलं

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित इंजिनियर विवाहितेनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी येथे घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी असं मृत विवाहितेचं नाव आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आरोपी असलेली मृत विवाहितेची सासू ही गावची सरपंच असून सासरे व्यवसायाने शिक्षक आहेत. वंशाला दिवा हवा म्हणून सक्तीने गर्भपात करणे आणि माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावणे, या छळाला कंटाळून दीप्तीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

याप्रकरणी दीप्तीची आई हेमलता मगर दिली असून, पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू तथा सरपंच सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी (सर्व रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ला. तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तसेच, ‘तू दिसायला सुंदर नाहीस, तुला स्वयंपाक आणि घरकाम जमत नाही, त्यापेक्षा शेतात राबणाऱ्या बाया बऱ्या,’ असे टोमणे मारून सासरच्यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

व्यवसायासाठी आणि गाडीसाठी लाखोंची मागणी

दीप्तीलापहिली मुलगी झाल्याने सासरची मंडळी नाराज होती. दरम्यान, पती रोहन याने एक्सपोर्टचा व्यवसाय बंद पडल्याचे कारण पुढे करत माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली. मुलीला त्रास नको म्हणून तिच्या आई-वडिलांनी ही रक्कम दिली. मात्र, त्यांची हाव इथेच थांबली नाही. लग्नात गाडी दिली नाही यावरून टोमणे मारत, रोहनने चारचाकी गाडी घेण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली. मुलीचा संसार टिकावा म्हणून माहेरच्यांनी पुन्हा तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. 50 तोळे स्त्रीधन बळकावले. लग्नात दीप्तीला माहेरून सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून देण्यात आले होते. ग्रामीण भागात चोरीची भीती दाखवून सासू आणि पतीने हे सर्व दागिने काढून घेतले. पुढे विचारणा केली असता, हे दागिने व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचं तिला सांगण्यात आलं.

पाषाणहृदयी सासर! ‘मुलगी नको’ म्हणून केला सक्तीने गर्भपात

नोव्हेंबर 2025 मध्ये घडलेला प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा होता. दीप्ती 5 महिन्यांची गर्भवती असताना, सासरच्यांनी तिला ‘आम्हाला वंशाला दिवा हवा आहे’, असं सांगत गर्भलिंग निदान चाचणी करण्यास भाग पाडले. पोटातील बाळ मुलगी असल्याचं समजताच, दीप्तीचा विरोध झुगारून तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. या घटनेने दीप्ती पूर्णपणे खचली होती.

सरपंच सासूच्या ‘मोठेपणा’साठी पैशांचा तगादा

ऑक्टोबर 2025 मध्ये सासू सुनीता चौधरी या सरपंच झाल्या. निवडणुकीत मोठेपणा मिरवण्यासाठी आणि सासूच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी दीप्तीकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यावर पती, सासू, सासरे आणि दीर यांनी तिला मारहाण केली. तसेच, माहेरच्या रो-हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. अखेर या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून 25 जानेवारी रविवारी रोजी रात्री दीप्तीने गळफास घेतला. दुर्दैवाची बाब म्हणजे, अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकलीसमोर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. उरुळी कांचन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *