मुंबईत इमारतीवर 2 राउंड गोळीबार, अभिनेता KKRने स्वीकारली जबाबदारी; कारण काय?

मुंबई शहरातील अंधेरीतील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली आणि रहिवासी भयभीत झाले होते. 18 जानेवारी रोजी ही घटना घडली होती स्थानिक लोकांनी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला आणि पोलिसांना कळवले. ज्यानंतर पोलिसांकडून तातडीने तपास सुरू झाला. दरम्यान याप्रकरणात अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर केकेआरचे नाव पुढे आले.

या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशय असलेल्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी पकडले. कमल रशीद खानला केआरके म्हणून ओळखले जाते. तो एक अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आले. केआरके हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. त्याच्या विरोधात पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती  पोलिसांच्या उच्चाधिकाऱ्यानी दिली. केआरकेच्या अटकेनंतर बॉलीवूड आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांकडून चौकशी

मुंबई पोलिसांच्या विशेष टीमने या घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यांनी केआरकेला प्रमुख संशयितांच्या यादीत ठेवलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या ठिकाणी पुरावा शोधण्यासाठी पोलिसांनी परिसराची तपासणी केली. केआरकेची चौकशी सुरू असून, त्याच्या जवळच्या व्यक्तींशीही बोलणी होत आहेत. ही घटना एखाद्या पूर्ववैमनस्यातून घडली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करतायत. तपासाच्या प्रक्रियेत सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचा जबाब नोंदवला जातोय.

केआरकेच्या जबाबात कबुली

चौकशीदरम्यान केआरकेने पोलिसांना दिलेल्या जबाबात स्वतः गोळीबार केल्याचे मान्य केले. त्याने सांगितले की, त्याच्या स्वतःच्या परवानगी असलेल्या बंदुकीने हे कृत्य घडले. पोलिसांना हे वाक्य ऐकून आश्चर्य वाटले, कारण असे कबुली देणे दुर्मीळ आहे. केआरकेने कारण सांगितले नाही, पण पोलिस हे शोधत आहेत. या कबुलीमुळे प्रकरण वेगाने पुढे सरकले आणि केआरकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बंदूक जप्त

पोलिसांनी केआरकेकडून त्याची बंदूक जप्त केलीय. ही बंदूक वैध परवानगी असलेली आहे, पण गोळीबारासाठी वापरल्याने ती पुरावा म्हणून ठेवली गेली. तपासकांनी बंदुकीची तपासणी करून गोळ्या आणि इमारतीवर सापडलेल्या खुणांशी जुळवणी केली. बंदुकीची कागदपत्रे तपासली जात असून काही उल्लंघन आढळल्यास अतिरिक्त आरोप लावले जातील, अशी माहिती देण्यात आलीय.

पुढील कारवाई काय? 

या प्रकरणात पोलिसांनी पुढील कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली आहे. केआरकेला न्यायालयात हजर करण्यासाठी तयारी चालू आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्याला जामीन मिळेल की नाही हे ठरेल. तुर्तास, तपास पूर्ण होईपर्यंत केआरके पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *