महावितरणाने चुकून दवाखान्याच कापली वीज, दवाखान्यात उडाला मोठा गोंधळ, ऑक्सिजन बंद अन्… नको तेच घडलं

शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात महावितरणच्या गंभीर निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या मृत्यू झाला असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीज बिल भरलेले असतानाही एका खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्ध आजोबांची मृत्यू झाला आहे. अनेक रुग्णांना अक्षरशः रस्त्यावर उपचार द्यावे लागल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

म्हसावद येथील खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा महावितरणने चुकून दुसऱ्याच्या ऐवजी कापल्याचा आरोप करण्यात येत आहे. वीज खंडित झाल्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणा ठप्प झाली आणि ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या आजोबांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यात वीज वितरण कंपनीने बुधवारी सकाळी ११ वाजता संबंधित रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला. त्याचवेळी रुग्णालयात इस्लामुद्दीन नझरुद्दीन लोहार (रा. म्हसावद) यांच्यावर उपचार सुरू होता. रात्रभर सुरळीत ऑक्सिजन पुरवठा त्यांना मिळाला नसल्याने गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे मयताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे वीज नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना उघड्यावर उपचार देण्याची वेळ आली. काही रुग्णांना तातडीने शहादा येथे हलवण्यात आले, तर काही रुग्णांवर सध्या दुसऱ्यांकडून वीजपुरवठा घेऊन उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे म्हसावद ग्रामीण रुग्णालयाची इमारत सध्या बांधकामात असल्याने हे रुग्णालय राणीपूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परिणामी म्हसावद परिसरातील जवळपास ५० किलोमीटरच्या परिसरात एकही शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्याने नागरिकांना खाजगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत बेजबाबदार असून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणारी असल्याचा आरोप होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *