मुंबई महापालिकेचा निकाल लागलाय. यात मतदारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिलाय. त्यामुळे महायुतीचा महापौर बसणार हे निश्चित झाले आहे. आता सोशल मीडियात या निवडणुकीचे विश्लेषण सुरु झाले आहे. अनेक सेलिब्रिटी मतदानासाठी उतरले होते. त्या विभागातून कोणते उमेदवार निवडून आले, यावर चर्चा सुरु आहे. अक्षय कुमारने मतदान केलं त्या विभागातून कोण जिंकलंय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वॉर्ड नेमका कसा आहे?
वार्ड 69 (के/पश्चिम) हा इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी राखीव आहे. याची एकूण लोकसंख्या 51 हजार 622 असून, त्यात 637 अनुसूचित जाती (एससी) आणि 262 अनुसूचित जमाती (एसटी) चे सदस्य आहेत. हा वार्ड मुंबईतील महत्वाच्या भागात येतो आणि येथे भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रभाव मजबूत आहे. निवडणुकीत येथे भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला. ज्यामुळे पक्षाची ताकद दिसून येते.
किती उमेदवार होते रिंगणात?
या वार्डात एकूण चार उमेदवार निवडणुकीत उतरले होते. प्रत्येक उमेदवाराने स्थानिक मुद्द्यांवर भर देऊन प्रचार केला होता. त्यात योगेश अनंत गोरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रकाश विठू येडगे (इंडियन नॅशनल काँग्रेस – आयएनसी), सुधा शंभूनाथ सिंह (भारतीय जनता पक्ष – भाजप) आणि सुहास बबन कावळकर (अपक्ष – आयएनडी) यांचा समावेश होता. यातील सुधा शंभूनाथ सिंह यांनी विजय मिळवला. हे निकाल मतमोजणीनंतर जाहीर झाले असून, यात पक्षीय स्पर्धा तीव्र होती, हे दिसून आले.
अक्षय कुमारचे मतदान
अक्षय कुमारने या निवडणुकीत आपल्या पत्नी ट्विंकल खन्नासोबत वार्ड 69 मध्ये मतदान केले. हे मतदान त्यांच्या राहत्या भागात झाले. ज्यामुळे त्यांच्या निवासस्थानाच्या वार्डातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अक्षय कुमारसारख्या प्रसिद्ध व्यक्तीच्या सहभागामुळे इतरांना प्रेरणा मिळाली.
कुठे केले मतदान?
अक्षय कुमार मुंबईतील जुहू तारा रोड भागातील समुद्रकिनारी प्राइम बीच इमारतीत राहतात, जी वार्ड 69 अंतर्गत येते. येथे भाजपच्या विजयामुळे त्यांच्या प्रभागात पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. हा भाग उच्चभ्रू असून तो सेलिब्रिटींमुळे चर्चेत राहतो. मतदान करताना अक्षयने लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग घेण्याचे महत्व सांगितले, ज्यामुळे मतदार जागृती वाढल्याचे दिसून आले.
