सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का! खासदार प्रणिती शिंदेंच्याच प्रभागात भाजपने उडवला ‘धुव्वा’, मविआचा सुफडा साफ

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच जुन घर सोलापूर विजयपूर महामार्गावर जाई जुई या नावाने आहे.प्रभाग 23 काँग्रेस खासदार प्रणिती शिंदें यांचं घर आहे. या प्रभागात महाविकास आघाडी आणि भाजप अशी जोरदार लढत झाली होती.दीपाली शहा(काँग्रेस),अलका राठोड(शिवसेना ठाकरे पक्ष),लक्ष्मण जाधव(ठाकरे पक्ष),सुनीता रोटे(राष्ट्रवादी तुतारी) असे महाविकास आघाडीचे उमेदवार होते.मात्र भाजपच्या पॅनलने महाविकास आघाडीच्या पॅनलचा सुफडा साफ केला आहे.खासदार प्रणिती शिंदें राहत असलेल्या प्रभागात भाजपचा पॅनल भरगोस मतांनी विजयी झाला आहे.

अशी लढत झाली होती

महाविकास आघाडी कडून दीपाली शहा (काँग्रेस) यांचा पराभव भाजपच्या आरती वाकसे यांनी पराभव केला आहे. ,महाविकास आघाडीच्या अलका राठोड या शिवसेना ठाकरे पक्षाकडून उभ्या होत्या.भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर यांनी अलका राठोड यांचा पराभव केला. अलका राठोड या काँग्रेस कडून माजी महापौर होत्या.नुकतीच अलका राठोड यांन ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली होती.भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर यांनी पराभूत केले.कैकाडी समाजातील प्रतिष्ठित नाव असलेले लक्ष्मण जाधव उर्फ काका दोन वेळा नगरसेवक होते,यंदा ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते,तसेच कैकाडी समाजाचे नेते आहेत.भाजपचे राजशेखर पाटील यांनी लक्ष्मण काका यांचा पराभव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *