मुंबईत महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. जोगेश्वरीतील वॉर्ड क्रमांक 73 मधून उद्धव ठाकरेंची मशाल धगधगली आहे. या प्रभागातून शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी(SP) यांच्या लोना रावत या उमेदवार विजयी झाल्या आहे. शिंदे गटाच्या खासदार रविंद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर-पोतनीसचा पराभव झाला आहे.
जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 मधून शिवसेनेच्या दीप्ती वायकर यांना 10293 मते मिळाले आहेत. तसेच लोना रावत (उद्धव ठाकरे) 13424 मते मिळाली आहेत. दरम्यान रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे रवींद्र वायकर यांना धक्का बसला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार लोना राजेंद्रसिंह रावत यांनी शिंदे गटाच्या दिप्ती वायकर यांचा पराभव केला. रविंद्र वायकर यांचा लोकसभा निवडणुकीत अवघ्या 48 मतांनी विजय झाला होता. त्यानंतर विधानसभेत पत्नी आणि आता बीएमसीमध्ये मुलगी पराभूत झाली.
पत्नीचाही पराभव
2024 च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचाही याच परिसरात अत्यंत निसटता पराभव झाला होता. दीप्ती वायकर यांच्या रूपाने वायकर कुटुंबाने पुन्हा एकदा या मतदारसंघावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मतदारांनी त्यांना कौल दिला नाही.
