मुंबई महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. भाजप ११ तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना १० जागांवर पुढे आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ११ जागांवर आघाडी घेतली आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६ जागांवर पुढे आहे. त्यामुळे बीएमसी निवडणूक मध्ये महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेसने ५ जागांवर खातं उघडायला सुरुवात केली आहे.
मतमोजणीला दहा वाजता सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या अर्ध्या तासाचा कल पाहिला असता भाजप ११, शिवसेना १० जागांवर पुढे आहे. महायुतीला एकूण २१ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना १४ जागांवर आणि मनसे ६ जागांवर पुढे आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला २० जागा मिळताना दिसत आहेत.
