15 जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचे मतदान आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी असणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने अनेक शाळांमध्ये मतदान आणि मतमोजणी ठेवली आहे. या निमित्ताने शहारातील अनेक शाळांना या कालावधीत सुट्टी जाहीर केली आहे.
विद्यार्थ्यांचा कसा असेल पुढील आठवडा?
मुंबईतील गोरेगाव परिसरातील लक्षधाम, गोकुळधाम आणि यशोधाम शाळांना 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अनेक शाळांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांत 15 जानेवरी रोजी मतदान असल्यामुळे सुट्टी आहे. यानंतर 16 जानेवारी रोजी शुक्रवार असल्याने त्यादिवशी अनेक शाळांनी ऑनलाईन शाळा घेण्याचा निर्णय आहे. 17 आणि 18 जानेवारी रोजी अनुक्रमे शनिवारी आणि रविवारी सुट्टी असणार आहे. यामुळे हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाचा असणार आहे.
अनेक शाळांमध्ये 14 ते 17 जानेवारी या चार दिवसांना जाहीर सुट्टी देण्यात आली. मतदान केंद्र म्हणून आणि निवडणूकविषयक कामांसाठी शाळेचा परिसर उपयोगात आणला जाणार आहे. त्यामुळे हा काळ शाळा बंद राहणार आहेत. तसेच मिरारोड परिसरातही शाळा बंद राहणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण सूचना जारी
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एका वेगळ्या आदेशात, पुरेसे मतदान आणि मतमोजणी कर्मचारी नियुक्त करण्याचे आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रशिक्षण वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. वाघमारे यांनी ६ आणि ७ जानेवारी रोजी झालेल्या निवडणूक आढावा बैठकींमध्ये हे निर्देश दिले.
29 शहरांमध्ये सुट्टी जाहीर
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 15 जानेवारीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी मतदान होणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, आणि चंद्रपूर.
15 जानेवारी रोजी सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
