बेंगळुरू, दुबई, कोलकाता, लंडन… मुंबई विमानतळाबाबत महत्त्वाची माहिती; काय सांगते आकडेवारी?

 मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात 5 कोटी 55 लाख प्रवाशांची वाहतूक झाली असून सन 2024 च्या तुलनेत 1.3 टक्के, तर सन 2023 च्या तुलनेत 7.6 टक्क्यांनी प्रवासी संख्येत वाढ नोंदली गेली आहे. यात देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद येथे, तर आंतरराष्ट्रीय ठिकाणांमध्ये दुबई, अबुधाबी, लंडन हिथ्रो आणि सिंगापूर या विमानतळांवर मुंबईहून प्रवासी दाखल झाले. 2025 मध्ये झालेली प्रवासी वाहतूक विक्रमी होती.

विमानांच्या ये-जामध्ये 25 टक्‍क्‍यांनी वाढ

मुंबई विमानतळावर एकूण 3 लाख 31 हजार 11 विमानांची ये-जा (एटीएम) झाली, ज्‍यामध्‍ये 92,141 आंतरराष्‍ट्रीय एटीएम आणि 2 लाख 38 हजार 870 देशांतर्गत एटीएमचा समावेश होता. या विमानतळावर या वर्षात 2022 च्या तुलनेत जवळपास 25 टक्‍क्‍यांनी विमानांची ये-जा वाढली आहे. यासोबतच मुंबईपासून नवीन शहरांपर्यंत विमानसेवाही यंदा सुरू झाली आहे.

अल्माटी, अम्मान, बाली (डेनपसार), कोपनहेगन, फुजैराह, क्राबी, मँचेस्टर आणि तिबिलिसी. आदमपूर, अमरावती, हिंडन, झारसुगुडा, पोरबंदर आणि सोलापूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाल्यामुळे देशांतर्गत जाळे आणखी मजबूत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *