2019 ला काकांना संपवल्याचा राग, पुतण्याने सूड घेतला, हिदायत पटेलांच्या खुनामागील Inside Story

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर काल मंगळवारी रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात आज त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

अकोट तालुक्यातील मोहोळ या त्यांच्या गावी हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला होता. हिदायत पटेल व मोहोळ गावातीलच एका पटेल कुटुंबीयांसोबत त्यांचे बऱ्याच वर्षापासून राजकीय भांडण होतं, याच भांडणातून विरुद्ध गटाच्या उबेद पटेल नावाच्या एका तरुणाने हिदायत पटेल यांच्यावर काल चाकू हल्ला केला. काल दुपारी दोन वाजताच्या नमाजानंतर हिदायत पटेल मोहोळा गावातील मरकज मशिदीत नमाज पडून बाहेर येत असताना उबेदनं हिदायत पटेल यांच्यावर चाकू अचानक हल्ला केला.

हिदायत पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूचे प्रचंड घाव लागल्यानं हिदायत पटेल यांना अकोट येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ अकोल्याला हलविण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आज बुधवारी रोजी पहाटे त्यांचं दुःखद निधन झालं. हिदायत पटेल यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *