डिसेंबरची डेडलाईन संपली, कामही पूर्ण; पण हाय कोर्टाच्या आदेशानंतरही वांद्रे स्कायवॉक बंद; कारण काय?

वांद्रे रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयादरम्यान नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी उभारण्यात आलेल्या स्कायवॉकचे पुनर्बाधणीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. मात्र, काम पूर्ण असूनही हा स्कायवॉक अद्याप नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आलेला नाही.

उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार डिसेंबरअखेर हा स्कायवॉक नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने कोणतेही उद्घाटन किंवा लोकार्पण करता येत नाही आहे. या गोष्टीचा फटका या लोकोपयोगी प्रकल्पाला बसला आहे. परिणामी, पूर्णत्वास गेलेला स्कायवॉक लोकार्पणाअभावी बंदच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *