पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर, काय मागणी? जाणून घ्या!

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन निदर्शने केली आहेत. हजारो विद्यार्थी एकत्रित होऊन PSI, STI आणि कंबाइंड परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याची जोरदार मागणी करत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये वयाची मर्यादा ओलांडल्याने अनेकांच्या स्वप्नांना धक्का बसलाय. ही मागणी केवळ वैयक्तिक नाही, तर अनेकांच्या भविष्याशी जोडलेली असल्याचे विद्यार्थी सांगतायत. या आंदोलनात विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने आपली बाजू मांडत असून आपला आवाज ऐकून घेण्याची विनंती करत आहेत.

काही लोकांनी या विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलणारी टोळी किंवा गँग म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचे कान कोणीतरी भरवले असतील, तरीही एकदा आमची खरी बाजू ऐकावी, असे विद्यार्थी सांगतायत. याआधी दोन वेळा परीक्षा पुढे ढकलली गेली तेव्हा त्यांनी अशी कोणतीही मागणी केली नव्हती. उलट जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच आम्ही वयोमर्यादा वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. हे युवक स्वतःला आंदोलनकर्ते गँग म्हणून ओळखले जाऊ नये अशी विनंती करत आहेत. अशा बदनामीमुळे आमचे मनोधैर्य खचू नये, म्हणून ते अपील करत आहेत.

शेवटचा मार्ग म्हणून आंदोलन

या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांनी अनेक आमदार, खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यालयात जाऊन शिफारस पत्रे मिळवली. कित्येक उंबरे झिजवले, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणूनच आता ते संविधानाने दिलेल्या शेवटच्या पर्यायाचा अवलंब करत आहेत, म्हणजे रस्त्यावर उतरून आंदोलन. हे आंदोलन त्यांच्या निराशेचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. वेळेवर परीक्षा देण्याची त्यांची इच्छा आहे पण वयोमर्यादा वाढवल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शांततापूर्ण मार्गाने सुरू केलेले प्रयत्न अपयशी ठरल्याने आता जनआंदोलनाचा आधार घेतल्याचे विद्यार्थी सांगतात.

भविष्याचा विचार

स्पर्धा परीक्षेत प्रत्येकाची निवड होणे शक्य नाही, आणि वयाची मर्यादा ओलांडल्याने अनेकांची संधी हुकते. सर्वांनी आपल्या भावा-बहिणींसाठी आणि स्वतःच्या भविष्यासाठी पाठिंबा द्यावा, उद्या Age Bar झाल्यावर काय करतील? असा प्रश्न त्यांनी विचारलाय. हे आंदोलन केवळ एका गटाचे नाही, तर सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचे आहे. सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देत आहेत, जेणेकरून भविष्यात अशा समस्या कमी होतील, असे आवाहन ते करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *