उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्यानंतर पूजा जाधव ढसाढसा रडल्या, ‘पहलगाम हल्ल्यावेळी ती चूक’

पूजा जाधव यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर या निर्णय प्रक्रियेवर टीका करण्यात आली. यानंतर पूजा मोरेला अर्ज मागे घ्यायला लावला. यासंदर्भात पूजा मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांच्या भावनांचा बांध फुटला अन् त्यांना अश्रू अनावर झाले. काय म्हणाल्या पूजा जाधव? सविस्तर जाणून घेऊया.

आज आम्ही दोघे सोशल मीडियाचे बळी ठरलोत.सोशल मीडियातील खोट्या व्हिडिओमुळे माझ्या पत्नीचा राजकीय बळी गेलाय, असे पूजा मोरेचे पती  धनंजय जाधव म्हणाले. खरंतर आम्ही पहिले प्रभाग क्रमांक 1 मधूनच लढणार होतो तिथूनच आम्ही तयारी केली.आम्हाला एनवेळी प्रभाग क्रमांक 2 मधून दिली. माझ्या पत्नीने भाजप प्रवेश केला त्यानंतरच तिकिट मिळाले.पण आजही संभाजी महाराज यांच्यासोबतच असल्याचे धनंजय जाधव म्हणाले.

लहान वयात माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. शौचालयाच्या बाहेर मी झोपून राहिले. वकिलांचे पैसे द्यायलाही माझ्याकडे नव्हते. माझा लढा फक्त शेतकऱ्यांसाठी होता, असे पूजा जाधव म्हणाल्या.

पहलगामहल्ला झाल्यानंतर एका तासात दिलेली ती प्रतिक्रिया होती. दहशतवाद्यांना आपल्या देशात हिंदू-मुस्लिम करायचंय, असं मला म्हणायचं होतं. तोपर्यंत व्हिडीओ पसरला. निगेटीव्ह गोष्टी पसरल्या. यानंतर 3 तासात वातावरण बदललंय. पण माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचली नाही, असे त्या पुढे म्हणाल्या.

पिढ्यानपिढ्या राजकारण करणाऱ्यांना हे सहन होत नाही.क्रांती मोर्चात फडणवीस यांच्या विरोधातलं ते वाक्य माझं नाही, हे मी वारंवार सांगतेय. तरीही विरोधकांच्या ट्रोलर्स ठरवून खोटे व्हिडिओ व्हायरल केले गेल्याचा आरोप त्यांनी केला. क्रांती मोर्चात फडणवीस यांच्या विरोधातलं ते वाक्य माझं नाही, हे मी वारंवार सांगतेय. तरीही विरोधकांच्या ट्रोलर्स ठरवून खोटे व्हिडिओ व्हायरल केले गेल्याचे त्या म्हणाल्या.भाजपने मोठ्या मनाने मला स्वीकारलं होतं. पण  विरोधकांनी ठरवून खोटे व्हिडिओ व्हायरल केले आज माझा राजकीय बळी दिला गेल्याचा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *