कार्यकर्त्यांसाठी कामिनी राहुल शेवाळेंची माघार, 25 वर्षीय कार्यकर्तीसाठी आमदार पत्नीची माघार; महाराष्ट्रातील ‘या’ प्रभागाची चर्चा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांची रस्सीखेच सुरू असताना शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीने मात्र कार्यकर्त्यांसाठी एक पाऊल मागे घेऊन संस्कारक्षम राजकारणाचा नवा पायंडा पाडला. कामिनी शेवाळे यांनी मुंबईतील प्रभाग क्रमांक 142 मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या कुमारी अपेक्षा गोपाळ खांडेकर यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

वास्तविक, मुंबईच्या पूर्व उपनगरातील 142 क्रमांकाच्या प्रभागातून कामिनी राहुल शेवाळे यांनी निवडणूक लढवावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती. कार्यकर्त्यांच्या या भावनेचा आदर राखत याठिकाणी अशी चाचपणी देखील करण्यात आली. मात्र स्थानिक 25 वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या कुमारी अपेक्षा खांडेकर यांनी याठिकाणी उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली. कामिनी यांचे पती शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे असतानाही उमेदवारीचा मोह न बाळगता कामिनी शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक 142 मधून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि अपेक्षा खांडेकर यांना उमेदवारी देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या या भूमिकेचे पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांसह सर्वांनीच कौतुक केले.

काय म्हणाल्या कामिनी शेवाळे?

मानखुर्दच्या 142 प्रभागातून मी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार मी चाचपणीला सुरुवात केली होती.मात्र, स्थानिक कार्यकर्त्या कुमारीअपेक्षा खांडेकर काही वर्षांपासून याठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी याठिकाणी सामाजिक कार्य केले आहे. त्यामुळे इथून माझ्याऐवजी अपेक्षा खांडेकर यांना उमेदवारी देण्याबाबत मी माझे पती राहुल शेवाळे यांच्याशी चर्चा केली. तसेच आम्ही पक्षश्रेष्ठींकडे यासंदर्भात  विनंती केली. ही विनंती मान्य करून 142 प्रभागातून अपेक्षा खांडेकर यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली, याचा मला आनंद आहे.

वाटल्या होत्या साड्या 

खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे हे मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 142 मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यास सुरुवातीपासून इच्छुक होत्या. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. ज्याकरिता त्यांनी त्या इच्छुक असलेल्या वॉर्डात महिलांना साडी वाटप केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी केला होता. पण, कामिनी शेवाळे यांनी साड्या वाटप केल्यानंतर संतापलेल्या काही स्थानिकांनी या साड्यांची होळी करत शेवाळेंचा निषेध केला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *